योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांच्या आंदोलनाच्या आधीच तीन दिवस 'स्टार माझा', 'आयबीएन् लोकमत', 'झी २४ तास' या मराठी वृत्तवाहिन्यांनी योगऋषी प.पू. रामदेवबाबांच्या विरोधात गरळओक करण्यास प्रारंभ केला
आहे. ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे आणि प.पू. रामदेवबाबा या दोघांच्या आंदोलनातील भेद दाखवून या आंदोलनाला छेद देण्याचा प्रयत्न चालू केला. 'स्टार माझा' या वृत्तवाहिनीने तर विशेष चर्चेचा कार्यक्रम ठेवून प.पू. रामदेवबाबांचे आंदोलन संघप्रेरीत कसे आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न चालू केला. अण्णा हजारे यांनाही या चर्चेत सहभागी करून घेऊन त्यांना 'तुम्ही संघ आणि भाजपचा पाठिंबा असलेल्या आणि पंचातारांकित असलेल्या बाबांच्या या आंदोलनात सहभागी होणार का', असे कोड्यात टाकणारे प्रश्न विचारून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प� [...] Thanks, Admin,
0 comments:
Post a Comment